पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरामध्ये आज नवीन 235 करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. सलग तिसऱ्या दिवशी दोनशेहून अधिक रुग्णांची भर पडली आहे. तर चार जणांचा मृत्यू झाला. आजपर्यंत शहरामध्ये 91750 जणांना करोनाची लागण झाली आहे.
पालिकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, शुक्रवारी चार वाजेपर्यंत शहरातील 235 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर शहराबाहेरील एकाही रुग्णाची नोंद झाली नाही. आज दिवसभरात 4 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
आतापर्यंत शहरामध्ये 91750 रुग्णांची नोंद झाली आहे. तर 2285 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये शहराबाहेरील 667 जणांचा समावेश आहे.
आज शहरातील काळेवाडी, वडमुखवाडी, भोसरी, चिंचवड येथील चार जणांचा मृत्यू झाला. आज दिवसभरात 226 रुग्णांना घऱी सोडण्यात आले. त्यामुळे आजपर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 87860 इतकी झाली आहे. तर दिवसभरात 4061 संशयित रुग्णांना महापालिकेच्या रुग्णालयामध्ये दाखल केले आहे. गेल्या तीन दिवसांतील 1085 जणांचे तपासणी अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.