राज्यात नुकत्याच लोकसभा निवडणुकीचे पाच टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. अशात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे नेते आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा महायुतीच्या सरकार गंभीर आरोप केले आहे. रोहित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात असलेल्या आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्यावर याआधी रुग्णवाहिका खरेदी घोटाळ्याचा आरोप करण्यात आला होता.
आरोग्य विभागात ॲम्बुलन्स खरेदीत साडेसहा हजार कोटी रुपयांची दलाली खाणाऱ्या भ्रष्टाचाराच्या ‘खेकड्या’ने आता अधिकाऱ्यांनाही नांग्या मारण्यास सुरवात केलीय. नियमबाह्य टेंडरिंगला नकार दिल्यामुळे व्यवस्थेतील याच खेकड्याने निलंबित केल्याची तक्रार पुणे महापालिकेतील आरोग्य अधिकारी डॉ.… pic.twitter.com/yuTYOgXn55
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 26, 2024
अशात पुणे महानगरपालिकेच्या निलंबित अधिकाऱ्याने लिहिलेल्या पत्रामुळे खळबळ उडाली आहे. निलंबित अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी आरोग्य मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. तसेच मी मागासवर्गीय असल्यामुळेच माझ्यावर जाणूनबुजून निलंबनाची कारवाई केली असल्याचा आरोप पवार यांनी केला आहे. याच आरोपाला धरून आता रोहित पवार यांनीही सरकारला लक्ष्य केले.
रोहित पवार यांनी एक्स अकाऊंटवर एक पोस्ट केली आहे
त्यांनी लिहीले आहे की,’ डॉ. भगवान पवार यांचे पत्र शेअर केले आहे. तसेच अधिकाऱ्यांना नांग्या मारणारा भ्रष्टाचाराचा खेकडा कोण? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. “आरोग्य विभागात रुग्णवाहिका खरेदीमध्ये साडेसहा हजार कोटी रुपयांची दलाली खाणाऱ्या भ्रष्टाचाराच्या ‘खेकड्या’ने आता अधिकाऱ्यांनाही नांग्या मारण्यास सुरवात केलीय. नियमबाह्य टेंडरिंगला नकार दिल्यामुळे व्यवस्थेतील याच खेकड्याने निलंबित केल्याची तक्रार पुणे महापालिकेतील आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडं केलीय. नियमबाह्य टेंडरसाठी कात्रजच्या कार्यालयात बोलावून दबाव आणणारा हा मंत्री म्हणजे आरोग्यमंत्रीच आहे का? आणि असेल तर संपूर्ण आरोग्य खात्याला आपल्या पोखरणाऱ्या या मंत्र्याला मुख्यमंत्री डॉ. एकनाथ शिंदे साहेब आपण अजून किती दिवस पाठीशी घालणार? आरोग्य व्यवस्थेला लागलेली ही किड काढण्यासाठी शस्त्रक्रिया कधी करणार?”, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.