JP Nadda on Lalu । लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील प्रचारात भाजप कोणतीही कसर सोडत नाही. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आज बिहारमध्ये आले आहेत. बिहारमध्ये त्यांनी जहानाबादमध्ये सभा घेतली. जहानाबाद येथील रॅलीदरम्यान राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी आरजेडीवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी बिहारच्या जनतेला पुन्हा एकदा जंगलराजची आठवण करून दिली.
तेजस्वी यादव यांच्यावर निशाणा JP Nadda on Lalu ।
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी जंगल राजच्या मुद्द्यावरून तेजस्वी यादव यांच्यावर हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी, ‘2005 पूर्वी जेहानाबादमध्ये 3 वाजल्यानंतर कोणी येत नव्हते किंवा जात नव्हते. शेतकरी स्थलांतरित होत होते, खून, अपहरण होत होते. या तेजस्वी यादवला वडिलांचे कारनामे कसे कळतात? बिहारला कोणत्या संकटांचा सामना करावा लागला? मी अजून विसरलो नाही.” असे त्यांनी म्हटले.
पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेबाबत बोलताना त्यांनी, ‘पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेंतर्गत प्रत्येक घराच्या छतावर सरकारी खर्चाने सौरऊर्जा बसवली जाईल. यामुळे तुम्हाला मोफत वीज मिळेल आणि उर्वरित वीज सरकार खरेदी करेल. तो तुमच्या उत्पन्नाचा स्रोत बनेल. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आरजेडीला राज्याला अंधारात न्यायचे JP Nadda on Lalu ।
आरजेडीवर हल्ला करतानानड्डा यांनी, ‘मोदीजींच्या नेतृत्वाखाली देश आणि बिहार विकासाची नवी कथा लिहित आहेत आणि जहानाबाद या विकासाशी स्वतःला जोडत आहे. 15 वर्षे येथे राज्य करणाऱ्या राजदला बिहारला पुन्हा कंदील युगात घेऊन जायचे आहे. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून काँग्रेसवर हल्लाबोल करताना ते म्हणाले, ‘लालू यादव यांनी नोकरीच्या बदल्यात जमिनीचा घोटाळा केला. ममता यांनी शिक्षक भरती घोटाळा केला. काँग्रेसच्या एका नेत्याला नोटा मोजण्यासाठी तीन दिवस लागले, असे म्हणत काँग्रेस भ्रष्टचारी असल्याचे म्हटले.