राजगुरूनगर -खेड तालुक्यात माध्ममिक शिक्षकांच्या करण्यात आलेल्या आरटीपीसीआर चाचणीच्या अहवालात दोन शिक्षक आणि एक शिक्षकेत्तर कर्मचारी मिळून असे तीन जण पॉंझिटिव्ह सापडले असून आज तिसऱ्या दिवशी तालुक्यात शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा अजूनही अल्प प्रतिसाद मिळत आहे
खेड तालुक्यातील आज अखेर 1351 पैकी 1280 शिक्षक कर्मचाऱ्यांचे स्वॅब घेण्यात आले. पैकी आजअखेर 530 जणांच्या चाचणी अहवालातून एकूण तीन शिक्षक आणि एक शिक्षकेत्तर कर्मचारी करोनाबाधित आढळून आल्याने शिक्षक वर्गात भितीचे तर पालकांवर्गात खळबळ उडाली आहे.
23 नोव्हेंबरपासून खेड तालुक्यात 16 माध्यमिक शाळा सुरु झाल्या होत्या. पहिल्याच दिवशी 1227 विद्यार्थी हजर होते. तर बुधवारी (दि. 25) एकूण 29 शाळा सुरु झाल्या आहेत. 1018 विद्यार्थी उपस्थित राहिल्याने विशेषतः शहरी भागासह परीसरातील विद्यार्थी संख्या कमी दिसत असल्यामुळे पालकांनी आपली मुले शाळेत पाठविण्यात नकारात्मकता दिसून येत आहे.
तालुक्यात 530 शिक्षकांच्या कोविड 19 चाचणी अहवालातनू चार जण करोनाबाधित सापडल्याने संपर्कबाधित शिक्षक धास्तावले आहे. तर अजुन 750 शिक्षकांचा चाचणी अहवालातून किती जण बाधित निघतात यावर सर्वाच्या नजरा लागल्या आहेत.