पुणे(प्रतिनिधी) – सराफाने ग्राहकाला देण्यासाठी दिलेले 17 लाखाचे दागिने घेऊन कामागार फरार झाला. ही घटना 19 नोव्हेंबर रोजी रविवार पेठेत घडली.
कायेम कामिस शेख(46,रा.नाना पेठे, मुळ-पश्चिम बंगाल) यांनी दिलेल्या फिर्यादीनूसार सुकुर वहाबअली सुलतान सहा(35,रा.मुळ पश्चिम बंगाल) याच्याविरुध्द फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार शेख यांने शेख ब्रदर्स गोल्ड स्मिथ नावाचे सोन्याचे दागिने घडविण्याचा व्यवसाय आहे. ते सराफांकडून दागिण्यांची ऑर्डर घेऊन दागिने पुरवतात. त्यांनी सुकुरला सोन्याचे 13 गंठण, 1 लाख 62 हजाराची रोकड आणी दुचाकी घेऊन अहमदनगर येथील जामखेड तालुक्यात सराफ अविनाश शहा यांच्याकडे पाठवले होते. मात्र तो दागिने, दुचाकी आणी रोकड असा 17 लाख 23 हजाराचा ऐवज घेऊन गेला तो परत आलाच नाही.
त्याने शहा यांना मालाची डिलेव्हरी केली नाही. यामुळे कायेम यांनी फरासखाना पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे, पोलीस निरीक्षक दादा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत करत आहेत.