सिंगापुर – सत्तर टक्के लोकांनी सतत मास्क ( face mask ) वापरला तरी करोनाचा ( corona ) प्रसार रोखता येतो असा निष्कर्ष एक पहाणीत निघाला आहे. तथापि मास्कसाठी वापरण्यात आलेले मटेरियल आणि त्याच्या वापराचा कालावधी या बाबीही त्यात महत्वाच्या आहेत असे त्यांनी म्हटले आहे.
फिजीक्स ऑफ फ्ल्युईड्स या जर्नल मध्ये हे पहाणी निष्कर्ष प्रकाशित करण्यात आले आहे. या विषयाचे अभ्यासक संजयकुमार यांनी सांगितले की कमी दर्जाच्या मटेरियलचाही मास्क ( face mask ) वापरला तरी करोनाचा प्रसार नियंत्रणात राखण्यास बरीच मदत होते.
श्वासोत्सवाच, शिंकणे आदि प्रकारातून बाहेर पडणारे तुषार रोखणे हाच मुख्य उद्देश असतो. करोनाच्या ( corona ) मोठ्या तुषारापेक्षा कमी आकाराचे तुषार अधिक घातक असतात असेही या पहाणीची निष्कर्ष आहे. करोनाचा प्रसार रोखण्यास सर्जिकल मास्क ( surgical mask ) अधिक कार्यक्षम असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.