मुंबई – चित्रपट सृष्टीतील हरहुन्नरी अभिनेता ‘रितेश देशमुख’ने दिवाळीनिमित्त सोशल मीडियावर एक खास व्हिडिओ शेअर करत आपल्या फॅन्सला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहे. परंतु रितेशने दिलेल्या शुभेच्छा सगळ्यांच्या कौतुकाचा विषय ठरतायत. त्याचे कारणही तसेच आहे.
शेअर केल्या व्हिडिओ मध्ये रितेश देशमुख आणि त्याच्या दोन मुलांनी एकाच रंगाचा कुर्ता आणि पायजमा परिधान केला आहे. विशेष म्हणजे हा कुर्ता रितेशने आपल्या आईच्या जुन्या साडीपासून शिवला आहे.
View this post on Instagram
‘आईची जुनी साडी, मुलांसाठी दिवाळीचे नवीन कपडे’ असं कॅप्शन रितेशने या व्हिडिओला दिले असून त्याची पत्नी अभिनेत्री जेनेलीया हिने हा व्हिडियो शूट केला आहे. सध्या रितेशच्या या व्हिडीओचं अनेक नेटकऱ्यांनी कौतुक केलं आहे.