नवी दिल्ली : भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी होताना दिसत आहे. असे असले तरी गेल्या 24 तासांत देशात 44,684 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 520 लोकांनी यात आपले आपले प्राण गमावले आहेत. जगात सर्वाधिक वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या अमेरिकेत आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, भारतात कोरोना रुग्णांची संख्या एकूण 87 लाख 73 हजार झाली आहे, तर आतापर्यंत 1 लाख 29 हजार 188 लोकांनी आपला जीव गमावला आहे. या आकडेवारीनुसार, आज देशात 4 लाख 80 हजार इतके कोरोनाचे अॅक्टिव रुग्ण आहेत. गेल्या 24 तासांत अॅक्टिव रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. चांगली बातमी अशी आहे, की आतापर्यंत एकूण 81 लाख 63 हजार लोक कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासांत कोरोनामधून 47 हजार 992 रुग्ण बरे झाले आहेत.
महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये कोरोनाचे अॅक्टिव रुग्ण, मृत्यू दर आणि रिकवरी रेटचे प्रमाण सर्वाधिक आहे. यासह, भारतात रिकवरी रेट देखील सतत वाढत आहे.
दरम्यान जगातील 217 देशांमध्ये कोरोना विषाणूचा प्रसार झाला आहे. आताही कोरोना रूग्णांच्या संख्येत विक्रमी स्तरावर वाढ होताना दिसत आहे. जगभरात रोज नव्या कोरोनाबाधितांच्या आकड्यात वाढ होत आहे. जगातील सर्वात सामर्थ्यवान देश अमेरिकेत ही परिस्थिती अत्यंत वाईट होत चाचली आहे.
अमेरिकेत दररोज दीड ते दोन लाख नव्या कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. जगातील संक्रमित लोकांमध्ये भारत दुसर्या क्रमांकावर आहे. इतकेच नाही तर मृत्यूच्या सर्वाधिक घटनांमध्ये भारत तिसर्या क्रमांकावर आहे. तसेच, जगभरात सर्वात जास्त अॅक्टिव रुग्ण आढणारा भारत भारत चौथा देश आहे.