विप्रो कंपनीचे संस्थापक अझीम प्रेमजी दानशूरच्या यादीत पहिला क्रमांकावर आपलं नाव कोरलं आहे. प्रेमजी यांनी एका दिवसात 22 करोड तर एका वर्षात 7904 करोड दान करणारे 2020 मधील सगळ्यात दानशूर भारतीय बनले आहे. हुरून रिपोर्ट इंडिया आणि एडेलगिव फाउंडेशन यांच्या रिपोर्टनुसार प्रेमजी यांंनी एचसीएल टेक्नोलॉजीेचे शिव नाडर यांना मागे टाकलं आहे. शिव नाडर हे अनेक वर्षांपासून अग्रेसन असायचे मात्र आता त्यांची जागा अजीम यांनी घेतली आहे. नाडर यांनी 2020 मध्ये 795 करोड रुपये दान केले आहेत. याधीच्या वर्षात त्यांनी 826 करोड रुपये दानासाठी खर्च केले होते.
प्रेमजी यांनी यापुर्वीच्या वर्षी आर्थिक वर्ष 2018-19मध्ये 426 करोड रुपये दान करण्यावर खर्च केले होते. मात्र त्यांनी यावर्षी सगळे रेकॉर्ड तोडले आहेत. अजीम यांच्या एंडोमेंट फंड मध्ये विप्रोच्या प्रमोटर्स 13.6 टक्के स्टेक पसरेंट आहेत. या फंडातून प्रमोटर म्हणून मिळणाऱ्या सगळी रक्कम घेण्याचा अधिकार आहे.
भारतातील सगळ्यात श्रीमंत परिवार आणि रिलायंस इंडस्ट्रीजचेे चेयरमैन मुकेश अंबानी हे दानशूरच्या यादीत तिसऱ्या स्थानावर होते. त्यांनी आर्थिक वर्ष 2018-19मध्ये 402 करोड रुपये खर्च केले होते. विप्रो कंपनीसोबतच इंफोसिसते तीन संस्थापक देखिल या यादीत समावेश आहेत. यात नंदन नीलेकणि यांनी 159 करोड रुपये, गोपाल कृष्णा यांनी 50 करोड रुपये आणि एसडी शिबूलाल यांनी 32 करोड रुपये दानासाठी खर्च केले आहेत.
कोरोना काळात अनेकगोष्टींसाठी खर्च करण्यात टाटा सन्स यांनी 1500 करोड रुपये खर्च करत सगळ्यांना मागे टाकलं आहे. त्यांच्या मागोमाग 1125 करोड रुपये खर्च करत अझीम हे दुसऱ्या स्थानावर आहेत. त्यांच्यासोबतच अडानी यांनी 510 करोड रुपये दान केले आहे. कोरोना काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार पी-एम केअर फंडमध्ये रिलायंस इंडस्ट्रीजने 500 करोड़ रुपये, टाटा संसने 500 करोड रुपये आणि आदित्य बिरला ग्रुपने 400 करोड रुपये का दान केले होते.
या दानाच्या निधीतील किंवा मदतनिधीतील सगळ्यात जास्त फायदा शिक्षण क्षेत्रास झाला. अनेक विद्यार्थ्यांंना य़ा निधीचा लाभ घेता आला.