कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता अनेक राज्यांत फटाक्यांवर बंदी घालण्यात आली आहे. राजस्थान, दिल्ली, ओडिशा, सिक्किम, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र या राज्यात फटाके बॅन करण्यात आले आहेत. त्यामुळे या वर्षी फटाक्यांविनाच दिवाळी साजरी करावी लागणार आहे.
मात्र प्रत्येक गोष्टीवर भारतीयांकडे नवे जुगाड असतात. तसंच काहीसं जुगाड भारतीयांनी फटाक्याबाबत काढले आहे. या जुगाडाचा व्हीडियो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तो व्हीडियो बघून अनेकांना हसू आवरलं नाही.
या व्हायरल व्हीडियोमध्ये फुग्यांची माळ केली आहे. त्याखाली एक धागा लावण्यात आला आहे. या धाग्याला आग लावली की फुगे आपोआप फुटत आहेत. प्रदुषणमुक्त फटाके म्हणूत याचा उल्लेख केला आहे. फेसबुकवर हा व्हीडियो अनेकांंनी पाहिला आहे. ‘पटाखे पर बैन लगाने से हुआ नया आविष्कार.’, असं लिहत अनेकांनी व्हीडियो शेअर केला आहे.