मुंबई – चलनातून बाद करण्यात आलेल्या 2,000 रुपयांच्या नोटांपैकी 97 टक्क्यांहून अधिक नोटा परत जमा करण्यात आल्या असून आता बाजारात फक्त 10,000 कोटी रुपये मुल्ल्यांच्या नोटा उरल्या आहेत, अशी माहिती बुधवारी रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (आरबीआय) दिली.
या वर्षी 19 मे रोजी रिझर्व्ह बॅंकेने 2 हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा केली होती. रिझर्व्ह बॅंकेने एका अधिसूचनेत म्हटले आहे की, 19 मे 2023 रोजी व्यवसायाच्या समाप्तीवेळी चलनात असलेल्या 2,000 रुपयांच्या नोटांचे एकूण मूल्य 3.56 लाख कोटी रुपये होते.
आता 31 ऑक्टोबर 2023 रोजी 10,000 कोटी रुपयांवर आले आहे. आरबीआयच्या म्हणण्यानुसार, अशा प्रकारे, 19 मे 2023 पर्यंत चलनात असलेल्या 2,000 रुपयांच्या एकूण नोटांपैकी 97 टक्क्यांहून अधिक नोट आता परत आल्या आहेत. दरम्यान, 2000 रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी किंवा जमा करण्यासाठी आरबीआय कार्यालयात रांगा लागत आहेत.