ठाणे – यंदाचं नवीन वर्ष बरोबर वीकेंडला आल्यामुळे शनिवार पासूनच तरुणाईचा पार्ट्यांकडे ओघ वाढला आहे. अशात ठाण्यामध्ये ( Thane rave party ) जंगलात सुरु असलेल्या एका रेव्ह पार्टीवर पोलिसांनी रेड करत तब्बल ९५ जणांना ताब्यात घेतलं आहे.यामध्ये ५ महिलांचा देखील समावेश आहे. अवैधरित्या पार्टीचे आयोजन केले गेले होते तसेच या पार्टीमध्ये अमली पदार्थाचा देखील समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले. ( thane police )
पार्टीमधील अनेकांकडे ड्रग्स, गांजा आणि इतर गोष्टी सापडल्याचे समोर आले आहे. ही सर्व मुलं चांगल्या घरातील असल्याचं सांगितलं जात आहे. कासावरडीतील खाडी परिसरातील जंगलात भयाण अंधारात या तरुण-तरुणींचा पाच तास नंगानाच सुरू होता.पोलिसांनी माहिती मिळताच या ठिकाणी छापा टाकत कारवाई केली.
पार्टीच्या आयोजकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पार्टीच्या ठिकाणी अमली पदार्थांसाठी एक वेगळा टेबल लावण्यात आला होता. त्यासह मटण, मच्छी, चिकन आणि दारूची व्यवस्था देखील याठिकाणी केली गेली होती. डीजेच्या तालावर थिरकण्यासाठी अनेक जण दुचाकी आणि चारचाकीसह याठिकाणी दाखल झाले होते.
#WATCH | Maharashtra: The Crime Branch team conducted a raid in Thane and detained several people. Further details awaited. pic.twitter.com/EZeNDaFwlb
— ANI (@ANI) December 31, 2023
रात्री 10 वाजता ही रेव्ह पार्टी सुरू झाली. पहाटे 3 वाजेपर्यंत ही पार्टी सुरू होती. या ठिकाणांहून पोलिसांनी २०० ग्रॅम गांजा, ७० ग्रॅम चरस, ०.४० ग्रॅम एलएसडी आणि एक्स्टसी गोळ्या जप्त केल्या आहेत.ताब्यात घेतलेल्या पार्टीबाजांची मेडिकल टेस्ट करून पुढील कारवाई सुरु करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.