सातारा (प्रतिनिधी) – आरोग्य विभागाकडून काल (दि. 11) रात्री जाहीर करण्यात आलेल्या माहितीनुसार, पुणे येथील एनसीसीएस, नारी, कराड येथील कृष्णा मेडिकल कॉलेज, एआरआयआयआयएसईआर या संस्थांकडून आलेल्या अहवालांमधील 94 जणांचे अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यातील आधीच्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या निकट सहवासातील 77, “सारी’च्या सात आणि प्रवास करून आलेल्या दहा, अशा एकूण 94 नागरिकांचे अहवाल करोनाबाधित आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी रविवारी दिली.
जावळी तालुक्यातील पुनवडी येथील 40 व 19 वर्षांचे पुरुष, 35, 31, 42, 72, 21 व 26 वर्षांच्या महिला, सायगावमधील 51 वर्षांचा पुरुष, कराड तालुक्यातील पंचायत समितीतील 50 वर्षांचा कर्मचारी, 56 वर्षांची महिला, मलकापुरातील 48, 30 व 21 वर्षांचे पुरुष, 75 वर्षांची महिला, ओगलेवाडीतील 72 व 41 वर्षांचे पुरुष, 35 वर्षांची महिला, मसूरजवळ कवठे येथील 35 वर्षांचा पुरुष, विठ्ठलवाडी (तुळसण) येथील 45 वर्षांचा परुष, तारुख येथील 65 वर्षांचा पुरुष, मसूर येथील 37 वर्षांची महिला, तोंडोली (ता. कडेगाव, जि. सांगली) येथील 34 वर्षांचा पुरुष, आटुगडेवाडी (ता. शिराळा, जि. सांगली) येथील 25 वर्षांचा युवक, कोरेगाव तालुक्यातील भाडळे येथील 23 व 30 वर्षांचे युवक, ल्हासुर्णे येथील 48, 25, 18 वर्षांचे पुरुष व 20 वर्षांची महिला, सुभाषनगर येथील 16, 44 व 16 वर्षे वयाचे पुरुष, 42 व 63 वर्षे वयाच्या महिला, निगडी येथील 25 वर्षांचा युवक, वाठार किरोलीतील 73 वर्षांचा वृद्ध, माण तालुक्यातील राजवडी (दहिवडी) येथील 31 वर्षांचा युवक, दहिवडीतील 45 वर्षांचा पुरुष, कारंडेवाडी (दहिवडी) येथील 23 वर्षांचा युवक, पाटण तालुक्यातील कुंभारगाव येथील 43 वर्षांची महिला, सोनाईचीवाडी येथील 44 वर्षांचा पुरुष, चाळकेवाडी (कुंभारगाव) येथील 55 वर्षांचा पुरुष, गारवडेतील 36 वर्षांचा युवक, कसणीतील 40, 15, 25 व 45 वर्षे वयाच्या महिला व 42, 25, 60, 75 वर्षांचे पुरुष, 14 वर्षांचा मुलगा, सातारा तालुक्यातील जिहे येथील 51, 50, 69 वर्षांचे पुरुष व 42, 65, 52, 60 व 24 वर्षांच्या महिला, खावलीतील 60 वर्षांची महिला व 63 वर्षांचा पुरुष, कण्हेर येथील 60 वर्षांची महिला, कोडोलीतील 40 वर्षांची महिला, वाई तालुक्यातील परसणीतील 65 वर्षांची महिला, 40 वर्षांचा पुरुष, सोनगीरवाडी येथील 36, 14 व 70 वर्षांचे पुरुष, फलटण तालुक्यातील आसू येथील 22 वर्षांची महिला, फरांदवाडीतील 69, 51 वर्षांचे पुरुष, दोन महिन्यांचे पुरुष जातीचे मूल,
जाधववाडीतील 13 वर्षांची मुलगी, 61 वर्षांची महिला, साखरवाडीतील 45 वर्षांची महिला, खंडाळा तालुक्यातील शिरवळमधील 22, 54, 65, 28, 71 वर्षांच्या महिला व 82, 34, 27, 25, 20 वर्षे वयाचे पुरुष, कोलाटे आळीतील 18 वर्षांचा तरुण, भगवा चौकातील 50 वर्षांचा पुरुष, अंबिकामाता येथील 62 वर्षांचा वृद्ध, शिर्के कॉलनी येथील 30 वर्षांची महिला, कबुले आळीतील 45, 22 वर्षांची महिला व 17 वर्षांचा तरुण, यांचे कोव्हिड अहवाल पाझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 17 हजार 623 नागरिकांच्या घशातील स्रावांचे नमुने घेण्यात आले असून बाधितांची एकूण संख्या एक हजार 695 झाली आहे. आतापर्यंत एक हजार 10 नागरिकांनी करोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. कोव्हिडमुळे जिल्ह्यात 65 जणांचा मृत्यू झाला असून उपचारा सुरू असलेली रुग्णसंख्या 620 आहे.