चेन्नई – तैवानमधील फॉक्सकॉन कंपनी आयफोनसाठी चीनमध्ये मोठ्या प्रमाणात सुटे भाग तयार करते. मात्र, चीनमधील बदललेली परिस्थिती पाहता हे उत्पादन केंद्र भारतामध्ये हलविण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे.
ही कंपनी चेन्नई येथे एक अब्ज डॉलरची म्हणजे जवळजवळ आठ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करून या ठिकाणी सुटे भाग तयार करणार आहे. चीनबरोबरचे या कंपनीचे संबंध बिघडले आहेत.