शरद पवार यांच्या पुढाकाराने खासगी कंपन्यांचा निधी
पुणे – करोनाबाधितांवर उपचारांसाठी परिणामकारक ठरणाऱ्या रेमडेसिवीर औषधाचे 200 डोस पुण्यात उपलब्ध झाले आहेत. ही माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.
ज्येष्ठ नेते व खासदार शरद पवार यांच्या प्रयत्नांमुळे काही कंपन्यांनी त्यांच्या सार्वजनिक दायित्व निधीतून (सीएसआर) ही औषधे उपलब्ध करून दिली आहेत. “रेमडेसिवीर’ ही करोनावर प्रभावी ठरणारी औषधी ससून सर्वोपचार रुग्णालयाकडे सुपूर्द करण्यात आली आहेत. याचा उपयोग गरीब रुग्णांवर मोफत केला जाणार आहे, असेही विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.