1082 जणांना लागण, 20 रुग्णांचा मृत्यू
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरात करोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 900 च्या पुढे गेली आहे. आतापर्यंत शहरात 901 रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. शहरात आज 1082 नवीन रुग्णांची भर पडली. आजपर्यंत शहरात 39,859 जणांना करोनाची लागण झाली आहे.
शुक्रवारी चार वाजेपर्यंत शहरात 1082 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. शहरातील 1038 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर शहराबाहेरील 44 जणांना करोनाची लागण झाली. आज दिवसभरात 20 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामध्ये शहरातील 15 व शहराबाहेरील 5 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत शहरातील एकूण रुग्णांची संख्या 39,859 इतकी झाली आहे. शहरातील महापालिकेचे रुग्णालय व कोविड केअर सेंटरमध्ये करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सद्यस्थितीत शहरात 7526 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यामध्ये शहराबाहेरील 572 रुग्णांचाही समावेश आहे.
दिवसभरात 20 रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला. शहरातील भोसरी, चिखली, पिंपळे गुरव, पिंपरी, मासुळकर कॉलनी, रुपीनगर, मोशी, निगडी, तळवडे, चऱ्होली, सांगवी येथील 15 रुग्णांचा मृत्यू झाला. तर शहराबाहेरील विश्रांतवाडी, पाषाण, राजगुरुनगर येथील 5 रुग्णांचा मृत्यू झाला. आज 450 रुग्णांना घऱी सोडण्यात आले. त्यामुळे आजपर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 26,220 इतकी झाली आहे.