पोक्‍सो कायद्याअंतर्गत 90 हजार खटले दाखल

नवी दिल्ली: बाल लैंगिक शोषण प्रतिबंधक कायदा म्हणजेच पोक्‍सो कायद्याअंतर्गत देशभरात विविध ठिकाणी सुमारे 90 हजार गुन्हे दाखल करण्यात आले असून सन 2016 पासून या खटल्यांची सुनावणी प्रलंबीत असल्याची माहिती आज सरकारतर्फे लोकसभेत देण्यात आली. महिला आणि बाल कल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी आज ही माहिती प्रश्‍नोत्तराच्या तासात दिली.

त्या म्हणाल्या की, या प्रकरणातील एकूण 90205 खटले सन 2016 पासून प्रलंबीत आहेत. देशातील कोणत्याही बालकाला लैंगिक शोषणासारख्या प्रकाराला सामोरे जावे लागू नये अशी आपल्या सर्वांचीच इच्छा आहे. त्या पार्श्‍वभूमीवर अशा प्रकारच्या तक्रारींवर तातडीने कारवाई केली जाते आणि त्या अनुषंगाने गुन्हे दाखल केले जातात असे स्मृती इराणी यांनी या विषयी लोकसभेत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्‍नांना उत्तर देताना सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.