लोकसभेत सुप्रिया सुळे व कनिमोळी संतापल्या

नवी दिल्ली: प्रश्‍नोत्तराच्या तासात पुरवणी प्रश्‍न विचारण्यास सभापतींनी पुरेसा अवधी न दिल्याने सुप्रिया सुळे व कनिमोळी या दोन महिला सदस्य आज लोकसभा सभागृहात संतप्त झालेल्या दिसल्या. तथापी हा कामकाज सल्लागार समितीचा निर्णय असल्याचे सांगत सभापती ओम बिर्ला यांनी त्यांच्या आक्षेपाकडे दुर्लक्ष केले. त्यांचे पुरवणी प्रश्‍न टाळून सभापतींनी दुसराच प्रश्‍न पुकारल्यानंतर विरोधी खासदारांनी सभागृहात जोरदार निषेधही नोंदवला.

महिला व बालकल्याण विभागाशी संबंधीत प्रश्‍न कनिमोळी आणि सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केले होते. पण त्यावर त्यांना पुरवणी प्रश्‍न विचारण्यास अनुमती नाकारण्यात आली. त्या संबंधात खुलासा करताना सभापती बिर्ला म्हणाले की सर्व राजकीय पक्षांचे नेत्यांचा समावेश असलेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत सदस्यांच्या अधिकाधिक प्रश्‍नांना वाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे त्यावरील पुरवणी प्रश्‍नांना कात्री लावण्यात आली आहे. यावर सदस्यांचे समाधान झालेले दिसले नाहीं.

Leave A Reply

Your email address will not be published.