नवी दिल्ली : करोनाच्या सरकारी आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्या आणि तबलिगी जमातच्या मेळाव्याला उपस्थित राहणाऱ्या 82 बांगलादेशी नागरिकांना दिल्ली न्यायालयाने जामीन मंजूर केला.
मुख्य न्यायदंडाधिकारी गुरमोहिना कौर यांनी प्रत्येकी 10 हजार रुपयांच्या प्रत्येकी व्यक्तिगत जातमुचलक्यावर मुक्तता करण्याचे आदेश दिले. या बांगलादेशींनी त्याचा जामीन अर्ज ऍड. अशीमा मांडला आणि मंदाकिनी सिंह यांच्या मार्फत दाखल केला.