चिंबळी – कुरूळी (ता. खेड) केंद्रा अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये जवळपास 80 टक्के पोषणआहार वाटपपाचे काम पूर्ण करण्यात आले असून उर्वरीत शाळांमध्ये दोन-तीन दिवसांत वाटप पूर्ण होणार असल्याची माहिती केंद्रप्रमुख हिरामण कुसाळकर यांनी दिली.
कुरूळी केंद्रात कंत्राटी कामगारांची मुले असून लॉकडाऊनमुळे औद्योगिक वसाहतीतील बहुतेक कामगार मुलांसह गावी गेल्यामुळे लाभार्थी विद्यार्थी संख्या काही प्रमाणात कमी झाली आहे.तरीही अनेक संकटातून मार्ग काढीत जास्तीत जास्त विद्यार्थांना लाभ देण्याचा सर्व शिक्षकांचा प्रयत्न असल्याचे केंद्रप्रमुख हिरामण कुसाळकर यांनी सांगीतले.
या कामी ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती, गटशिक्षणाधिकारी संजय नाईकडे व पोलीस प्रशासनाचे सहकार्य लाभले आहे. कुरूळी शाळेत चंद्रकांत सोनवणे, एम. के. सोनवणे, मुुख्याधापिका शोभा सुतार, फडकेवस्ती शाळेत मुख्याध्यापक अरुण गायकवाड, शाळा समिती अध्यक्ष राजेश येळवंडे, सद्गुरुनगर शाळेत अध्यक्षा सीमा नाणेकर, शिक्षिका संध्या गायकवाड, मुख्याध्यापक दत्तात्रय वेताळ, कुरणवस्ती शाळेत हिरामण येळवंडे, मुख्याध्यापक सुखदेव मुंगसे यांच्याहस्ते पोषण आहाराचे वाटप करण्यात आले.
या शाळांमध्ये वाटप
कुरूळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत 800 पैकी 700, फडकेवस्ती शाळेतील 34, चिंबळीत 399 पैकी 141, निघोजे शाळेत 583 पैकी 500, मोई येथे 300 पैकी 200, सद्गुरूनगर येथे 91 पैकी 56, कडवस्ती येथे 68 पैकी 50, बर्गेवस्ती 115 पैकी 66, मुटकेवस्ती येथे 392 पैकी 170, चाकण उर्द शाळेत 328 पैकी 240, चाकण नं 1मध्ये 650 पैकी 500, नं 2 मध्ये 820 पैकी 600 विद्यार्थ्यांना आतार्पंत पोषण आहाराचे वाटप करण्यात आले.