पुणे जिल्ह्यात गावकारभाऱ्यांसाठी 80.54 टक्के मतदान

पुणे  – जिल्ह्यातील 649 ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी शांततेत मतदान झाले. 2 हजार 439 मतदान केंद्रांवर 80.54 टक्के मतदान झाले असून मतदानाची टक्केवारी वाढल्याचे दिसून आले. 5 हजार 33 ग्रामपंचायत सदस्यपदासाठी 11 हजार 7 उमेदवार रिंगणात आहेत. या उमेदवारांचे भवितव्य आज मतदान यंत्रात बंद झाले. दरम्यान मतमोजणी सोमवारी (दि.18) होणार आहे.

 

 

जिल्ह्यात मतदानाला सकाळी साडेसात वाजता सुरुवात झाली. सकाळपासून मतदान करण्यासाठी मतदारांचा उत्साह दिसून आला. काही मतदान केंद्रांवर सकाळी दहानंतर गर्दी झाली. दुपारी दिड वाजेपर्यंत जिल्ह्यातील निम्म्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. दिड वाजेपर्यंत जिल्ह्यात 51.03 टक्के इतके मतदान झाले होते. त्यानंतर साडेतीनपर्यंत 66.22 टक्के इतके मतदान झाले होते.

 

 

साडेतीन वाजेपर्यंत वेल्हे, भोर, पुरंदर, बारामती, शिरुर, मावळ या तालुक्यांमध्ये 70 टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले होते. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी मतदान केंद्रांवर एकूण 13 हजार 417 इतके कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. तसेच, आवश्यक तो पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

 

 

746 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला. यातील 97 ग्रामपंचायती याआधीच बिनविरोध झाल्या आहेत.

 

तालुका – ग्रामपंचायती- एकूण मतदार – झालेले मतदान – टक्केवारी

 • वेल्हे – 20 – 14802 – 12832 – 86.69 टक्के
 • भोर – 63- 66201 -56621 -85.53 टक्के
 • दौंड – 49 -172370 -136685 -79.30 टक्के
 • पुरंदर – 105283 -87332 – 82.95 टक्के
 • इंदापूर – 57 -158599 -129926 -81.92 टक्के
 • बारामती – 49 -119965 -101110 -84.64 टक्के
 • जुन्नर – 59 -119965-91829 -76.55 टक्के
 • आंबेगाव – 25- 54045 – 41567 -76.91 टक्के
 • खेड- 80 -125279 -10279 -82.04 टक्के
 • शिरुर -62 -16903 -138975 -82.77 टक्के
 • मावळ – 49-82519 -67464 -81.76 टक्के
 • मुळशी – 36 -71310- 54385 -76.27 टक्के
 • हवेली – 45 -130581- 96599 – 73.98 टक्के

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.