नवी दिल्ली – मोदी सरकारला याच महिन्यात आठ वर्ष पुर्ण होत आहेत. त्या निमित्ताने सरकारच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाची आखणी करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे प्रमुख नेते आणि मंत्री बुधवारी पक्षाच्या मुख्यालयात भेटतील आणि नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या आठ वर्षांच्या पुर्ततेनिमीत्त कार्यक्रमांची आखणी करतील. हा कार्यक्रम भव्य स्वरूपात साजरा होईल.
या बैठकीत भाजपचे प्रमुख जेपी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सहभागी होणार आहेत. आठ वर्षाची पुर्ती साजरी करण्यासाठी सेवा आणि गरीब कल्याणाशी संबंधित 15 दिवसांच्या दीर्घ कार्यक्रमांच्या अंमलबजावणीवर देखील यावेळी चर्चा होईल. सरकारची सर्व धोरणे आणि कार्यक्रम लोकांपर्यंत पोहोचवण्याचे लक्ष्य यात निश्चीत केले जाणार आहे. या आठ वर्षाच्या कारकिर्दीचे रिपोर्ट कार्ड देखील तयार केले जाणार आहे.