सॉफ्टहार्ड, टेक महिंद्रा संघांचा उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश

7 वी कॉर्पोरेट सुपर 9 टी-20 क्रिकेट स्पर्धा

पुणे – स्पोर्टीलव व महाराष्ट्र क्रीडा यांच्या तर्फे 7व्या कॉर्पोरेट सुपर 9 टी-20 क्रिकेट स्पर्धेत सॉफ्टहार्ड, सेल2वर्ड, टेक महिंद्रा व फुजित्सु या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी, लवळे क्रिकेट मैदान येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत अमित कदमच्या दमदार 85 धावांच्या बळावर सॉफ्टहार्ड संघाने टीम स्प्रिंग संघाचा 96 धावांनी दणदणीत पराभव करत उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला. पहिल्यांदा खेळताना सॉफ्टहार्ड संघाने 9 षटकात 3 बाद 128 धावांचा डोंगर रचला. 128 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अजित गव्हाणेच्या अचूक गोलंदाजीपुढे टीम स्प्रिंग संघ 9 षटकात 5 बाद 31 धावांत गारद झाला. अमित कदम सामनावीर ठरला.

वैभव पंडूलेच्या अष्टपैलु कामगिरीच्या जोरावर सेल2वर्ड संघाने कालसॉफ्ट संघाचा 4 गडी राखून पराभव करत उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला. पहिल्यांदा खेळताना कालसॉफ्ट संघाने 9 षटकात 4 बाद 57 धावा केल्या. 57 धावांचे लक्ष वैभव पंडूलेच्या 39 धावांसह सेल2वर्ड संघाने केवळ 7.5 षटकात 4 बाद 62 धावांसह सहज पुर्ण केले. वैभव पंडूले सामनावीर ठरला.

अन्य लढतीत फुजित्सु संघाने इ ऑन्ड वाय संघाचा 6 गडी राखून तर टेक महिंद्रा संघाने गोद्रेज प्रॉपर्टीज्‌ संघाचा 31 धावांनी पराभव करत उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)