केडन्स संघाचा क्‍लब ऑफ महाराष्ट्रवर 7 गडी राखून विजय

पीवायसी-गोल्डफिल्ड-मांडके चषक क्रिकेट स्पर्धा : पीवायसीचा पूना क्‍लब संघावर 7 गडी राखून विजय

पुणे – पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित पीवायसी-गोल्डफिल्ड-मांडके चषक या सर्वातजुन्या व अनोख्या निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत पहिल्या सामन्यात गणेश गायकवाड याने केलेल्या अष्टपैलू कमगिरीच्या जोरावर केडन्स संघाने क्‍लब ऑफ महाराष्ट्र संघावर 7 गडी राखून विजय मिळवला. तर, दुसऱ्या सामन्यात यश माने(17-3 व 24-5) याने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर पीवायसी हिंदू जिमखाना संघाने पूना क्‍लब संघाचा 7 गडी राखून पराभव करत शानदार सुरुवात केली

डेक्कन जिमखाना क्रिकेट मैदानावर झालेल्या सामन्यात पहिल्या डावात केडन्स संघ 35 षटकात 5बाद 183धावा अशा सुस्थितीत होता. तत्पूर्वी काल क्‍लब ऑफ महाराष्ट्र संघ पहिल्यांदा खेळताना 30.3षटकात 116धावावर संपुष्टात आला. याच्या उत्तरात केडन्स संघाने 40 षटकात 5बाद 199धावा करून 83धावांची आघाडी घेतली. यात निखिल पराडकर 57, गणेश गायकवाड नाबाद 70, अथर्व धर्माधिकारी 20, हर्षद खडीवाले 14, अजित गव्हाणे नाबाद 22 यांनी धावा करून संघाच्या डावाला आकार दिला. दुसऱ्या डावात क्‍लब ऑफ महाराष्ट्र संघाने 20षटकात 4बाद 135 धावा केल्या. पण त्यांचे 4 गडी बाद झाल्याने अंतिम धावसंख्या 115धावा(वजा20धावा) झाली.

यात युवराज झगडे 35, यश क्षीरसागर नाबाद 29, देवदत्त नातू 22, नौशाद शेख 18, सुरज शिंदे 18 यांनी धावा केल्या. केडन्सकडून सिद्देश वरगंटी(26-1), हर्षद खडीवाले(17-1), अक्षय वाईकर(21-1), गणेश गायकवाड(19-1)यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. पहिल्या डावात 83धावांची आघाडी असलेल्या केडन्स संघाला निर्धारित षटकात विजयासाठी केवळ 32 धावांचे आव्हान होते. हे आव्हान जय पांडे 21धावा, अथर्व काळे नाबाद 14धावा यांनी केलेल्या धावांच्या जोरावर 8.3षटकात 3 गड्यांच्या बदल्यात 35धावा करून पूर्ण केले.

पीवायसी हिंदू जिमखाना येथील क्रिकेट मैदानावर काल पूना क्‍लबला 38.3षटकात 163धावापर्यंत मजल मारता आली. पीवायसीचा आज 22षटकांपासून खेळ सुरु झाला. यात अभिषेक परमारने 115 चेंडूत 63धावा व दिव्यांग हिंगणेकरने 22धावा यांनी संघाला सुरेख सुरुवात करून दिली. पण दोघेही बाद झाल्यानंतर रोहन दामले 12, साहिल मदन नाबाद 37, योगेश चव्हाण नाबाद 21, साहिल छुरी 20 यांनी छोटी खेळी करत पीवायसीला 40 षटकात 9बाद 201 धावाचे लक्ष उभारून दिले. पण त्यांचे 9 गडी बाद झाल्याने संघाची अंतिम धावसंख्या 156धावा(वजा45धावा) झाली व त्यामुळे पहिल्या डावात पुना क्‍लबने 7 धावांची नाममात्र आघाडी घेतली.

दुसऱ्या डावात यश माने(24-5)याने केलेल्या भेदक गोलंदाजीपुढे पूना क्‍लबला 20षटकात 9बाद 121 धावाच करता आल्या. 9 गडी बाद झाल्याने पूना क्‍लबची धावसंख्या 76धावा(वजा 45धावा)झाली. पीवायसीकडून यश माने 24 धावात 5 गडी बाद करून पूना क्‍लबचा निम्मा संघ बाद केला. यशला दिव्यांग हिंगणेकरने 23धावात 2 गडी, तर प्रदीप दाढेने 14 धावात 1 गडी बाद केला. पीवायसीला विजयासाठी 83 धावांची गरज होती. यात दिव्यांग हिंगणेकरने 33 चेंडूत 8चौकार व 3षटकारांसह नाबाद 59 धावा, अभिषेक परमारने 14धावा, प्रीतम पाटीलने 15धावा करून संघाला सहज विजय मिळूवन दिला. सामन्याचा मानकरी यश माने ठरला.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.