सासवड- पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वाघिरे महाविद्यालयात नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 350 उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या असून यामधून 79 उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. या मेळाव्याचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या हस्ते झाले.
नोकरी महोत्सवात टेक महिंद्रा, मेगूस, डायनॅमिक सोल्युशन, टोरुस, रेडिअंत, आर्ष मॅनेजमेंट, एम.डी. इंडिया, एस.बी.आय., एच.डी.एफ.एल., आय.बी.एम.एस. आदी दहा कंपन्यांच्या एच. आर. व्यवस्थापकांनी 350 उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. एस. एम. दोरगे यांनी केले तर प्रा. विलास वाणी यांनी आभार मानले.