विविध मागण्यांसाठी तहसील कर्यालयापुढे आंदोलन
राजगुरुनगर- खेड तालुक्यातील आदिवासी नागरिकांनी विविध मागण्यांसाठी शनिवारी (दि. 21) सकाळी खेड तहसीलदार कार्यालयापुढे राष्ट्रव्यापी ठिय्या आंदोलन केले.
बिरसा क्रांती दलाच्या नेतृत्वाखाली खेड तालुक्यातील आदिवासी बांधवांनी खेड तालुक्यात पेसा कायदा लागू करावा, सुकंदर (ता. खेड जि. रत्नागिरी) येथील शिक्षक सुशील कुमार पावरा यांच्यावरील अन्याय दूर करावा, खेड जिल्हा पुणे तालुक्यात अतिवृष्टी मुले आदिवासी शेतकऱ्यांच्या भात शेतीचे व भात खाचरांचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी, चिखलगाव येथील शासकीय आश्रम शाळा साकुर्डी येथे स्थलांतरित करून सुरू करावी, आदिवासी विभागाच्या वसतिगृहात आदिवासी मुलांचे प्रवेश तत्काळ करावेत, आदिवासी महिला व मुलींवर होणारे अत्याचार दूर करून अत्याचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आदी मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन केले.
या आंदोलनाचे नेतृत्व बिरसा क्रांती दलाचे खेड तालुका कार्याध्यक्ष हरिभाऊ तळपे यांनी केले. यावेळी अध्यक्ष रोहिदास सुपे, नगरसेवक राहुल आढारी, सरपंच सुधीर भोमाळे, आदिवासे नेते संतोष भांगे, चंद्रभागा भोमाळे, बिरसा क्रांती दलाचे, उपाध्यक्ष नानाजी भोकटे, जालिंदर किर्वे, चंद्रकांत वाखाले, भागुजी बुरुड, अजय ठोकळ, समीर ठोकळ, शांताराम फोरसे, शशिकांत आढारी, संकेत झांजरे, रमाबाई गेंगजे, मंगेश तिटकारे, सुरेश निर्मळ, कल्पना लांघी आदी आदिवासी बांधव उपस्थित होते. दुपारी बाराच्या सुमारास मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार मालती धोत्रे देऊन ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले.