करोनावरील औषधांच्या 72 चाचण्या अमेरिकेत सुरू 

वॉशिंग्टन  – करोनावर औषध शोधण्यात अमेरिकेन बरीच प्रगती केली असून या औषधांच्या अमेरिकेत 72 चाचण्या सुरू आहेत, अशी माहिती अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. ते म्हणाले की, त्याखेरीजही आणखी 211 चाचण्या घेतल्या जाणार आहेत. अनेक अंगांनी याचे संशोधन सुरू आहे.

जी औषधे तयार केली जात आहेत त्यात करोना होऊ नये म्हणून लसही तयार केली जात असून करोनाचा प्रसार रोखण्यासाठीच्या औषधांच्याही चाचण्या सुरू आहेत. थेट करोना विषाणुंवर हल्ला करता येईल अशाही औषधांच्या चाचण्या सुरू आहेत आणि त्यातील संशोधनात अमेरिकेने बरीच प्रगती केली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

अमेरिकेत करोनाचा पहिला रुग्ण सापडल्याच्या दिवसापासून आम्ही त्यावर वैद्यकीय उपाय शोधून काढण्याच्या प्रयत्नांत आहोत असेही त्यांनी सांगितले. पण आमच्या या प्रयत्नांकडे माध्यमांनी पुरेसे लक्ष दिले नसलची खंतही त्यांनी व्यक्‍त केली. पण त्यांना आता यावर लवकरच स्टोऱ्या लिहाव्या लागतील असा टोमणाही त्यांनी माध्यमांना मारला.

आत्तापर्यंत हायड्राक्‍सीक्‍लोरोक्वीन या भारतातून आयात करण्यात आलेल्या औषधांवरच अमेरिकेची सारी उपचाराची भीस्त होती. पण आता करोनावरील खरे ओैषध सापडणे हे आता फार दूर राहिलेले नाही, तुम्ही लवकच त्याविषयीची चांगली बातमी ऐकू शकता असा दिलासाहीं त्यांनी पत्रकारांना दिला. अत्यंत सुरक्षित लसीद्वारे करोनाचा प्रसार रोखणे लवकरच शक्‍य होईल असा दावाही त्यांनी केला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.