मुंबई – बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री झीनत अमान यांना कोणत्याही परिचयाची गरज नाही. बॉलिवूडमध्ये ग्लॅमर वाढवणाऱ्या पहिल्या अभिनेत्रींपैकी त्या एक आहे. झीनत अमान आज भलेही 71 वर्षांच्या झाल्या असेल, पण त्यांच्या लूक, स्टाइल आणि फॅशन आजही चर्चेत असतात. चाहत्यांना त्यांची फॅशन आजही आकर्षित करते.
झीनत अमान सोशल मीडियाव सक्रिय आहे. आणि दररोज त्या आयुष्यातील अपडेट्स इंस्टाग्रामवर शेअर करत असतात. नुकताच झीनत यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, जो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
ज्येष्ठ बॉलीवूड स्टार झीनत अमानने ‘दम मारो दम’च्या काही ओळी म्हटल्याआहे. झीनत यांनी इंस्टाग्रामवर एक क्लिप शेअर केली आहे. क्लिपमध्ये झीनत खूपच सुंदर दिसत आहे. झीनत यांनी काळ्या रंगाचे चमकदार जाकीट आणि गडद सनग्लासेस घातले आहेत. जाहिरात व्हिडिओमध्ये, त्या आरशासमोर उभ्या आहे आणि ‘कभी खुशी कभी गम’ मधला एक डायलॉग म्हणत आहे, त्यानंतर त्यांनी 1971 मध्ये आलेल्या ‘हरे रामा हरे कृष्णा’ चित्रपटातील ‘दम मारो दम’ या गाण्याच्या काही ओळी गायल्या आहे. एकंदरीत त्या एका रॅपर प्रमाणे दिसून येत आहे.
झीनत अमान सध्या चित्रपटांपासून दूर आहे, परंतु त्या आयुष्यातील प्रत्येक लहान-मोठी अपडेट सोशल मीडियावर चाहत्यांसह शेअर करते. झीनतच्या स्टाइलचे चाहते आजही वेडे आहेत. त्या मुलांसोबत जास्त वेळ घालवतात.