मुंबई – अभिनेत्री आयुष्मान खुरानाच्या ‘ड्रीम गर्ल 2’ चित्रपटाचे पहिले पोस्टर समोर आले आहे. ज्यामध्ये आयुष्मान खुरानाची म्हणजेच पूजाची झलक दिसली आहे. याआधी निर्माते चित्रपटाचे वेगवेगळे टीझर घेऊन चाहत्यांना एक्साइट करत होते, मात्र आता आयुष्मान खुरानाने त्याची झलक दाखली आहे. पोस्टरमध्ये आयुष्यमान नवीन अवतारात दिसत आहे.
पोस्टरमध्ये आयुष्मान पडद्याआडून डोकावताना दिसत आहे आणि फक्त त्याचा चेहरा दिसत आहे. आयुष्मानचा लूक एका मुलासारखा आहे पण पडद्यामागे लांब केस असलेल्या मुलीची सावली दिसते. हे पोस्टर खूपच मनोरंजक दिसत आहे,
या चित्रपटात आयुष्मान मुलगा असला तरी त्याच्या आत एक मुलगी देखील आहे. आयुष्मानने इन्स्टाग्रामवर हे पोस्टर शेअर केले असून, कॅप्शनमध्ये त्याने लिहिले आहे, “पूजा ड्रीम गर्ल लवकरच येत आहे. २५ ऑगस्ट होगा मस्त, ड्रीम गर्ल २५ ऑगस्टला चित्रपटगृहात दाखल होत आहे.
‘ड्रीम गर्ल 2’ ची निर्मिती एकता आर कपूर आणि शोभा कपूर यांनी केली आहे आणि याचे दिग्दर्शन राज शांडिल्य यांनी केले आहे. हा चित्रपट ‘ड्रीम गर्ल’चा सिक्वेल आहे. अनु कपूर, विजय राज, मनजोत सिंग आणि अभिषेक बॅनर्जी यांच्या भूमिका आहेत. चित्रपटाच्या पहिल्या भागात आयुष्मान खुरानासोबत नुसरत भरुचा महत्त्वाच्या भूमिकेत होती. तर या भागात तिच्या जागी अनन्या पांडे दिसणार आहे. या चित्रपटाची कथा करमाभोवती फिरते. जो मुलीचा आवाज काढण्यात माहीर आहे. पैसे कमावण्यासाठी तो कॉल सेंटरमध्ये नोकरी करतो आणि पूजा म्हणून लोकांशी बोलतो. मात्र तिचा आवाज ऐकून अनेक लोक पूजाचे वेडे होतात.