रायगड – रायगड जिल्ह्यातील महाड एमआयडीसीतील केमिकल कंपनीत लागलेल्या भीषण आगीत आतापर्यंत 7 कामगारांचा होरपळून मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तर उर्वरित चार कामगार अद्याप बेपत्ता आहेत.
महाडमधील ब्लू जेट केमिकल कंपनीत आग लागली होती. त्यामध्ये 11 कामगार अडकले होते. गॅस गळतीमुळे आधी स्फोट झाला आणि मग आग भडकल्याची माहिती आहे. या सकाळी 11 वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. त्यामध्ये 11 कामगार अडकले होते. तर पाच जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.