कुरकुंभ -येथील औद्योगिक वसाहतीमध्ये पहिला करोनाबाधित रुग्ण सापडला होता. या रुग्णाच्या संपर्कातील सर्व सात जणांचा अहवाल मंगळवारी (दि. 2) निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती दौंड तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक रासगे यांनी दिली.
प्रशासन सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व खबरदारी घेत आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, तसेच अफवांवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन डॉ. रासगे यांनी केले आहे.