केंद्र सरकारच्या विभागांमध्ये तब्बल 7 लाख पदे रिक्त 

नवी दिल्ली – देशात नोकऱ्यांचा अभाव हा चर्चेचा मोठा मुद्दा ठरत आहे. अशातच केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या विभागांमध्ये जवळपास 7 लाख पदे रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. सरकारकडूनच ती माहिती बुधवारी लोकसभेत देण्यात आली.

केंद्र सरकारच्या विभागांमध्ये मंजूर पदांची संख्या 38 लाखांहून अधिख आहे. त्यातील 31 लाख 18 हजार पदे 1 मार्च 2018 पर्यंत भरली गेली. त्यामुळे 6 लाख 84 हजार पदे अजूनही रिक्त असल्याचे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सभागृहात लेखी उत्तराद्वारे स्पष्ट केले. निवृत्ती, मृत्यू, बढती आदी कारणांमुळे पदे रिक्त होतात, असेही त्यांनी नमूद केले.

Leave A Reply

Your email address will not be published.