डेहराडून – केदारनाथ तीर्थस्थळाकडे गेलेल्या एका खासगी कंपनीचे एक हेलिकॉप्टर त्या भागात कोसळून झालेल्या अपघातात वैमानिकासह सात जण ठार झाल्याचे वृत्त आहे. ( 7 killed as helicopter crashes near Kedarnath Dham) हे हेलिकॉप्टर एका डोंगराला धडकून हा अपघात झाला.
त्या भागात सध्या धुक्याचे साम्राज्य आहे. त्यामुळे वैमानिकाला अंदाज न आल्याने ते एका डोंगराला धडकले. हेलिकॉप्टरमध्ये वैमानिकासह एकूण सात जण होते.
The news of the helicopter crash of pilgrims returning from #Kedarnath Dham is sad. Mydeepest condolences to the families of the pilgrims who lost their lives in this accident.May Baba Kedarnath give them the strength to bear this trauma and give peace to the departed souls. pic.twitter.com/Y7d4KbKID1
— Rekha Mahajan (@RekhaMAHAJAN7) October 18, 2022
उत्तराखंडमधील केदारनाथ तीर्थस्थळाचे दर्शन झाल्यानंतर यात्रेकरूंना घेऊन येणारे हे हेलिकॉप्टर केदारनाथपासून 2 किमी अंतरावर कोसळले.
तत्पूर्वी या हेलिकॉप्टरला आग लागली होती असे काहींचे म्हणणे आहे. पण हेलिकॉप्टर त्यानंतर एका डोंगराला धडकले आणि कोसळले. राज्याचे मुख्यमंत्री पुष्कर धामी यांनी या दुर्घटनेवर दु:ख व्यक्त करून याच्या चौकशीचा आदेश दिला आहे.