वाई मतदारसंघात 61.85 टक्के मतदान

वाई – वाई विधानसभा मतदार संघात काही ठिकाणी व्हीव्हीपॅट मशीन बंद पडल्याने मतदारांना अडचणींचा सामना करावा लागला. पावसाने उघडीप दिल्याने वाई मतदार संघात मताचा टक्का वाढला आहे. त्यामुळे काही ठिकाणी एक तास वाढवून देण्यात आला तर किरकोळ बिघाड झालेल्या ठिकाणी वेळ वाढवून देण्यात न आल्याने काही ठिकाणी वादाचे प्रसंग निर्माण झाले. व्हीव्हीपॅट मशिनच्या बिघाडामुळे काही ठिकाणी लोकांच्या उत्साहावर विरजण पडले.

सकाळी उत्साहाच्या वातावरणात मतदान करण्यासाठी मतदारांनी चांगली गर्दी केली. परंतु व्हीव्हीपॅट मशिनच्या बिघाडामुळे मतदान प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला. सकाळी सात वाजता मतदान प्रक्रियेस प्रारंभ झाला तर सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदानाची वेळ असल्याने सकाळी व संध्याकाळी मतदारांनी रांगा लावून मतदानाचा हक्क बजाविला. दोन दिवस मुसळधार पाऊस कोसळत होता त्यामुळे उमेदवारांसह प्रशासन चिंतेत होते.

परंतु पावसाने उघडीप दिल्याने मतदान सुरळीत पार पडले. सकाळी आकरा वाजेपर्यंत 21 टक्के मतदान झाले, दुपारी एक वाजेपर्यंत 30 टक्के मतदान झाले. तर सायंकाळी पाच वाजेपर्यंत 61.85 टक्के टक्के मतदान झाले. तर संध्याकाळी सहा वाजता वाई विधानसभा मतदार संघात मतदान चालू राहिल्याने वेळ वाढवून देण्यात आली. काही मशिनच्या तांत्रिक अडचणी सोडल्या तर बाकी मतदान सुरळीत पार पडले. प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे काही ठिकाणी मतदार राजा मतदानापासून वंचित राहिल्याने जाहीर नाराजी व्यक्त केली.

Leave A Reply

Your email address will not be published.