6 लाख 62 हजार नागरिकांची मतदानाकडे पाठ

विधानसभा मतदार संघनिहाय झालेले मतदान

शहरी मतदारांत उदासीनता : 3,18,051 पुरूष आणि 3,44,596 महिला मतदानाला गेल्याच नाही

222 – शेवगाव विधानसभा मतदारसंघातील 3 लाख 38 हजार 788 मतदारापैकी 2 लाख 14 हजार 785 मतदारांनी मतदान केले. यात 1 लाख 16 हजार 821 पुरुष व 97 हजार 963 महिला मतदार आहेत. मतदानाची टक्केवारी 63.40 एवढी आहे. 223 – राहुरी विधानसभा मतदारसंघातील 2 लाख 88 हजार 127 मतदारापैकी 1 लाख 92 हजार 386 मतदारांनी मतदान केले. यात 1 लाख 5 हजार 728 पुरुष व 86 हजार 657 महिला मतदार आहेत. मतदानाची टक्केवारी 66.77 एवढी आहे. 224 – पारनेर – विधानसभा मतदारसंघातील 3 लाख 17 हजार 8 मतदारापैकी 2 लाख 9 हजार 799 मतदारांनी मतदान केले. यात 1 लाख 13 हजार 431 पुरुष व 96 हजार 368 महिला मतदार आहेत. मतदानाची टक्केवारी 66.18 एवढी आहे. 225 – अहमदनगर विधानसभा मतदारसंघातील 2 लाख 85 हजार 913 मतदारापैकी 1 लाख 72 हजार 276 मतदारांनी मतदान केले. यात 93 हजार 937 पुरुष व 78 हजार 333 महिला मतदार आहेत. मतदानाची टक्केवारी 60.25 एवढी आहे. 226 – श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील 3 लाख 09 हजार 324 मतदारापैकी 2 लाख 302 मतदारांनी मतदान केले. यात 1 लाख 11 हजार 910 पुरुष व 88 हजार 392 महिला मतदार आहेत. मतदानाची टक्केवारी 64.75 एवढी आहे. 227 – कर्जत विधानसभा मतदारसंघातील 3 लाख 15 हजार 88 मतदारापैकी 2 लाख 1 हजार 973 मतदारांनी मतदान केले. यात 1 लाख 10 हजार 747 पुरुष व 91 हजार 226 महिला मतदार आहेत. मतदानाची टक्केवारी 64.10 एवढी आहे.

नगर – यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीत मतदानाचा टक्‍का वाढविण्यासाठी निवडणूक आयोगासह सामाजिक, राजकीय संस्थांसह अन्य घटकांनी प्रयत्न केले. मतदाराचा हक्‍क बजावण्यासाठी जनजागृती मोठ्या प्रमाणावर केली तरी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात तब्बल सहा लाख 62 हजार 727 मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरविली. नेहमीप्रमाणे यात सर्वाधिक महिला मतदारांचा समावेश आहे.

नगर लोकसभा मतदारसंघात 18 लाख 54 हजार 248 मतदार आहे. त्यात 9 लाख 70 हजार 625 पुरुष तर 8 लाख 83 हजार 535 महिला मतदार आहेत. निवडणूक आयोगाने मतदानाचा टक्‍का वाढविण्यासाठी सर्वच पातळ्यावर प्रयत्न केले. रविवारी मतदान न घेता अन्य वार मतदानासाठी निवडले, सलग सुट्ट्या येणार नाहीत याची काळजी घेतली, जाहिरातीसह गावोगावी जावून मतदान यंत्रांची माहिती देतांनाही मतदानचा हक्‍क बजावण्याबाबत जनजागृती करण्यात आली.

यावेळी महिलांचे मतदान वाढविण्यासाठी प्रायोगित तत्वावर सखी मतदार केंद्र ही संकल्पना राबविण्यात आली. या मतदान केंद्रावर सर्व सेवा व सुविधा उपलब्ध करू देण्यात आल्या. अर्थात या सखी मतदान केंद्राचा प्रचार व प्रसार करण्यात जिल्हा प्रशासन कमी पडले ही वस्तूस्थिती आहे. दिव्यांगाचा टक्‍का वाढविण्यासाठी यावेळी विशेष मोहिमच राबविण्यात आली. त्यांनी नोंद करून त्यांना मतदानापर्यंत आणण्याचे नियोजन करण्यात आले आहे. परंतु जिल्ह्यात नोंद झाली, पण दिव्यांगांना मतदान केंद्रापर्यंत आणण्याचा त्रास प्रशासनाने घेतला नाही. जे दिव्यांग मतदानासाठी आले, त्यांना सेवा व सुविधा देखील मिळाल्या नाही.

निवडणूक आयोगाने मतदानाचा टक्‍का वाढविण्यासाठी प्रयत्न केले. त्याबरोबर प्रशासनाकडून देखील होतील तेवढे प्रयत्न झाले असतांनाही 2014 च्या तुलनेत केवळ दोन टक्‍के मतदानात वाढ झाली आहे. मागील लोकसभा निवडणुकीत 62.33 टक्‍के मतदान झाले होते. यावेळी ते 64.26 टक्‍के मतदान झाले आहे. या निवडणुकीत 18 लाख 54 हजार 248 मतदारांपैकी 11 लाख 91 हजार 521 मतदारांनी मतदानाचा हक्‍क बजावला. त्यात 9 लाख 70 हजार 625 पुरुष मतदारांपैकी 6 लाख 52 हजार 574 तर 8 लाख 83 हजार 535 महिला मतदारांपैकी 5 लाख 38 हजार 939 मतदारांनी मतदानाचा हक्‍क बजावला.

6 लाख 62 हजार 727 मतदारांनी या निवडणुकीकडे पाठ फिरविली आहे. त्यात 3 लाख 18 हजार 51 पुरुष तर 3 लाख 44 हजार 596 महिलांचा समावेश आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय मतदारांची स्थिती एकसारखीच आहे. शेवगाव मध्ये 3 लाख 38 हजार 788 मतदारांपैकी 2 लाख 14 हजार 785 मतदारांनी मतदान केले असून 1 लाख 24 हजार 3 मतदारांनी पाठ फिरविली. राहुरीमध्ये 2 लाख 88 हजार 127 मतदारांपैकी 1 लाख 92 हजार 386 मतदारांनी मतदाराचा हक्‍क बजावला. या मतदार संघात 95 हजार 741 मतदारांनी मतदान केले नाही.

पारनेर मतदारसंघात 3 लाख 17 हजार 8 मतदारांपैकी 2 लाख 9 हजार 799 मतदारांनी मतदान केल असून 1 लाख 7 हजार 209 मतदारांनी पाठ फिरवली. नगर शहरात 2 लाख 85 हजार 913 मतदार होते. त्यापैकी 1 लाख 72 हजार 276 मतदारांनी मतदान केले. सुमारे 1 लाख 72 हजार 276 मतदारांनी मतदान केले नाही.
श्रीगोंदा मतदारसंघात 3 लाख 9 हजार 324 मतदारांपैकी 2 लाख 302 मतदारांनी मतदान केले असून 1 लाख 9 हजार 22 मतदारांनी पाठ फिरविली. कर्जतमध्ये 3 लाख 15 हजार 88 मतदार होते. त्यापैकी 2 लाख 1 हजार 973 मतदारांनी मतदान केले. सुमारे 1 लाख 13 हजार 115 मतदारांनी मतदान केले नाही.

मतदानासाठी प्रशासनाच्यावतीने मोठ्या प्रमाणात व्यापक मोहीम राबविली होती. सखी आणि आदर्श मतदान केंद्र स्थापन करण्यात आले. घरपोच व्होटर आयडी स्लीप पोहचविण्यात आली. त्यानंतर अनेकांनी मतदानाचा पवित्र हक्क बजावलाच नाही. सोशल मीडियावरूनही व्यापक जनजागृतीचा परिणाम दिसला नाही. परिणामी मतदानाचा टक्का घसरला.

मतदान टाळण्याची अनेक कारणे

मतदानाला का गेले नाही, असा थेट प्रश्‍न विचारला असता अनेकांनी प्रचंड ऊन होते. उन्हात मतदानात जायचे कसे, असा उलट सवाल केला. कोणी निवडून आला तरी काय फरक पडतो, असे सांगणारेही महाभाग दिसून आले. नोकरीनिमित्त बाहेरगावी असणारे आणि मतदार यादीत नावच सापडले नाही, असे सांगणारेही मतदार आहेत. मतदान टाळण्याचे कारणे सांगून लोकशाहीच्या उत्सवात ही मंडळी सहभागी झाली नाही.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.