गट-तट विसरून डोंगरगणकरांचे श्रमदान

गाव पाणीदार करण्यासाठी सरसावले युवक

नगर – नगर तालुक्‍यातील डोंगरगण गावाने सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेतला असून, गावच्या विकासासाठी गट-तट विसरून सर्वांनी एकत्र येवून दुष्काळाशी दोन हात करत 45 दिवस गाव अखंड श्रमदान करणार असल्याचे वॉटर हिरो किशोर काळे यांनी सांगितले.

नगर तालक्‍यातील डोंगरगण येथे सत्येव जयते वॉटर कप स्पर्धेला 8 एप्रिल रोजी सुरुवात झाली. या स्पर्धेत सलग 45 दिवस नागरिक मोठ्या संख्येने सहभाग घेऊन श्रमदान करत आहेत. समतोलचर व शेतात बांधबंदिस्ती केल्याने जमिनीचा पोत टिकून राहतो. डिपसीसीटी करू धावत्या पाण्याला अडथाळा करून जमिणीमध्ये पाणी जिरवले जात असल्याचे काळे यांनी सांगितले.

जनार्धन खंडागळे, मनोज मते, नंदकिशोर खेत्री, राम मते, राहुल आढाव, तुषार मते, अभिषेक मते, शिवराज औटी, आदीनाथ पटारे, विशाल भुतकर, प्रवीण आढाव, नीलेश मते, विकास झरेकर, प्रतिक मते, अक्षय मते, महेश मते, योगेश भुतकर, शंकर चांदने, इंद्रभान झरेकर, मच्छिंद्र झरेकर, सागर झरेकर, अविनाश झरेकर, अमोल काळे आदींसह ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत. श्रमदानामध्ये गावातील लहान मुलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला असून, गाव पाणीदार करण्यासाठी श्रमदानात सहभागी होण्याचे आवाहन वॉटर हिरो यांनी केले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.