जकार्ता – इंडोनेसियाला आज 6.4 क्षमतेच्या भूकंपाचा धक्का बसला. देशाच्या नैऋत्येकडील सुलावेसी प्रांताला हा भूकंपाचा धक्का बसला. मात्र या भूकंपामुळे त्सुनामी लाटांचा कोणताही धोका नाही. या भूकंपाचा केंद्रबिंदू वेकाटोबी बागाच्या इशान्येला 223 किलोमीटर अंतरावर समुद्राखाली 32 किलोमीटरवर होता.
शुक्रवारीही मलक्का समुद्राच्या उत्तरेकडील भागात 6.0 तीव्रतेचा भूकंप झाला होता. तसेच याआधी, 19 एप्रिल रोजी, बुधवारी इंडोनेशियातील साबांगच्या 16 किमी पश्चिम नैऋत्येस रिश्टर स्केलवर 4.4 तीव्रतेचा भूकंप झाला, असे युनायटेड स्टेट्स जिऑलॉजिकल सर्व्हेने सांगितले. मात्र या दोन्ही बूकंपामुळे त्सुनामी लाटांची शक्यता नाकारण्यात आली होती.