टोकियो – जपानच्या उत्तरेकडील भागाला आज 6.1 क्षमतेच्या भूकंपाचा धक्का जाणवला. जपानच्या उत्तरेकडील एओरी भागाला हा धक्का जाणवला. मात्र या भूकंपामुळे त्सुनामी लाटांचा कोणताही इशारा देण्यात आलेला नाही.
भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीखाली 20 किलोमीटरवर होता, असे जपानच्या हवामानशास्त्र संस्थेने म्हटले आहे. या बूकंपामुळे कोठेही मोठी हानी झाल्याचे वृत्त नाही. तसेच जीवितहानी झाल्याचे देखील जपानी माध्यमांनी म्हटलेले नाही.
दुसरीकडे आज भारतात लडाख परिसरातही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. या भूकंपाची तीव्रता 4.3 इतकी होती, असे भूगर्भशास्त्र संस्थेने म्हटले आहे. सकाळी 10 वाजून 47 मिनिटांनी या भूकंपाचे धक्के जाणवले.
या भूकंपाचा केंद्रबिंदू लेहच्या उत्तरेला 166 किलोमीटरवर आणि जमिनीखाली 105 किलोमीटरवर होता. या भूकंपामुले कोठेही पडझड झाल्याचे वृत्त नाही.