नगर -रेल्वे स्टेशन येथील दत्त हॉटेल येथे सुरु असलेल्या शिवभोजन केंद्राचे छायाचित्र काढून एका तोतया पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्त्याने शिवभोजनची तक्रारी मिटविण्यासाठी 5 लाख रुपयाची खंडणीची मागणी केली आहे. याबाबत अजित गायकवाड यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार
दिली आहे.
शहरात 15 मे रोजी शिवभोजन थाळीचे वाटप सुरु असताना तोतया पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्याने रेल्वे स्टेशन येथील दत्त हॉटेल मध्ये येऊन शिवभोजन वाटपाचे छायाचित्र काढण्यास सुरुवात केली. त्याला विचारणा केली असता पत्रकार व सामाजिक कार्यकर्ता असल्याचे व पत्नी एका पक्षाची पदाधिकारी असल्याचे त्याने सांगितले.
तर शहरात दहा शिवभोजन केंद्र असून, या संबंधी तक्रार व बातम्या थांबवायच्या असल्यास प्रत्येक सेंटरकडून 50 हजार प्रमाणे 5 लाख रुपये देण्याची मागणी या व्यक्तीने केली. अन्यथा गुन्हा दाखल करण्यासाठी त्याने धमकावले असल्याचे गायकवाड यांनी कोतवाली पोलीस स्टेशनला दिलेल्या जबाबात म्हंटले आहे.