सोरतापवाडी -हवेली तालुक्यातील उरूळी कांचन येथील बाजारपेठ सुरू झाली आहे. शनिवार (दि.16) पहिल्याच दिवशी नागरिकांनी गर्दी केली होती. लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर ही बाजारपेठ ओस पडली होती. उरूळी कांचन ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला आहे. यासाठी दोन ग्रुप बनविले आहेत. ए ग्रुपमध्ये हार्डवेअर, इलेक्ट्रिकल्स, मोबाइल शॉपी, झेरॉक्स आदी दुकानांचा समावेश आहे. ही दुकाने सोमवार, बुधवार, शुक्रवारी खुली राहणार आहेत. तसेच बी ग्रुपमध्ये कापड, सुवर्ण पेढ्या, गॅरेज आदी दुकानांचा समावेश आहे. ही दुकाने मंगळवार, गुरूवार, शनिवार खुली राहणार आहेत. तसेच रविवार गावातील संपूर्ण व्यवहार बंद राहणार आहेत. बाजारपेठ सुरू झाल्यामुळे सकाळी कापड, सुवर्ण पेढ्यामध्ये गर्दी दिसून आली.