नवी दिल्ली : पाकिस्ताच्या उत्तर-पश्चिम भागामध्ये आज सकाळी ९ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास तब्बल ५.७ रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याचे सांगण्यात येत आहे. या भूकंपाची तीव्रता इतकी होती की पंजाब आणि जम्मू काश्मीरमध्ये देखील या भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती समोर आली आहे.
भूकंपाचे केंद्र इस्लामाबादपासून सुमारे १८० किलोमीटर अंतरावर अफगाणिस्तान-ताजिकिस्तानच्या सीमारेषेजवळ या भूकंपाचे केंद्र असल्याची देखील माहिती मिळत आहे.
Jolts of earthquake felt in Kashmir, Noida and other areas. Details awaited.
— ANI (@ANI) February 5, 2022
भूकंपामुळे थेट पंजाब आणि जम्मू काश्मीरमध्ये धक्के जाणवले. याशिवाय चंदीगड आणि दिल्ली एनसीआर परिसरामध्ये देखील भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची माहिती मिळत आहे.
या भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानमधील काबूलपासून २५९ किलोमीटर उत्तर-पूर्व, ताजिकिस्तानमधील दशानबेपासून ३१७ किलोमीटर दक्षिणपूर्व आणि पाकिस्तानमधील इस्लामाबादपासून ३४६ किलोमीटर उत्तर –पश्चिम असल्याची माहिती नॅशनल सेंटर फॉर सेस्मोलॉजिने दिली आहे.