गोरखपूर – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज आपल्या निवडणूक अर्जासोबत जी मालमत्ता जाहीर केली आहे त्यानुसार त्यांची एकूण संपत्ती 1 कोटी 54 लाखांची आहे.
आपल्या विरोधात एकही गुन्हा दाखल नाही असेही त्यांनी यातील प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. 2017 सालच्या निवडणूक अर्जात त्यांनी आपली एकूण संपत्ती 95 लाख 98 हजार रुपये इतकी असल्याचे म्हटले होते. गेल्या पाच वर्षात त्यांची संपत्ती सुमारे 60 लाख रुपयांनी वाढली आहे.