लंडन : भारत व ब्रिटन यांनी परस्परात दीर्घ मुदतीचे व्यापार करार घडवून आणण्याच्या दृष्टीने शक्यता आजमावण्याचे ठरविले आहे. येथे दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांची नुकतीच 3 दिवस बैठक झाली, तीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.
जूनमध्ये मंत्र्यांची बैठक
भारत-ब्रिटन संयुक्त आर्थिक समितीची बैठक येत्या जूनमध्ये येथे भरणार असून त्यावेळी भारत व ब्रिटन या दोन्ही देशांचे परराष्ट्र मंत्री हजर राहणार आहेत.
विवाह कायदा सुधारणा बिल
नवी दिल्ली – घटस्फोट अधिक सुकर करण्यासाठी हिंदू विवाह कायदा व खास विवाह कायदा यामध्ये सुधारणा करण्याचे सरकारने ठरविले आहे. कायदे आयोगाने आपल्या 59व्या अहवालात शिफारस केलेल्या काही बाबींचा या विधेयकात समावेश असेल.
हिंदू विवाह कायदा 1955 साली तयार करण्यात आला तर खास विवाह कायदा तत्पूर्वी 1 वर्ष तयार झाला. सध्याच्या परिस्थितीत लग्न होऊन 3 वर्षे झाल्याशिवाय घटस्फोट मागता येत नाही. ही मुदत 1 वर्ष असावी, अशी सूचना करण्यात आली आहे.