पोलाद उत्पादनात भारताचा 9वा क्रमांक
नवी दिल्ली – पोलादाच्या उत्पादनात 1976 साली भारताने दक्षिण आफ्रिका, कॅनडा, बेल्जियम व स्पेन या देशांना मागे टाकले आहे. भारताचा आता पोलाद उत्पादनात जगात 9वा क्रमांक लागतो. 1975 साली 13वा क्रमांक होता.
अमेरिकेकडून भारतास युरेनियम मिळणार
नवी दिल्ली – तारापूर अणुशक्ती केंद्रासाठी अमेरिकेकडून लवकरच युरेनियमचा पुरवठा सुरू होईल. युरेनियम घेऊन येणारे जहाज लवकरच निघणार.
“प्रश्नोत्तरांचा तास हा करमणुकीचा तास!’
नवी दिल्ली – कॉंग्रेस सदस्य प्रकाश मल्होत्रा यांनी आज राज्यसभेतील प्रश्नोत्तराच्या तासाचे “करमणुकीचा तास’ असे वर्णन केले. आरोग्यमंत्री राजनारायण हे प्रश्नांना उत्तरे देण्याऐवजी लांब लांब व्याख्याने झोडतात. नियोजित आरोग्य योजनेत आरोग्यविषयक सामाजिक कार्यकर्त्यांचे काम काय, याविषयी आर. के. मिश्रा यांनी प्रश्न विचारला होता. त्यांनी अशी तक्रार केली की, राजनारायण यांनी याचे उत्तर दिलेच नाही!