अमेरिकेशी संबंध सुधारण्याचे प्रयत्न
पॉंडिचेरी : अमेरिकेबरोबर संबंध सुधारण्यासाठी भारत विधायक प्रयत्न करीत आहे, असे परराष्ट्रमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी सांगितले. परदेशात भारताबद्दल खूपच मैत्रीपूर्ण वातावरण आहे. तसेच आर्थिक व सांस्कृतिक क्षेत्रातही वाढते सहकार्य आहे.
मूलभूत परिवर्तनाने प्रश्न सुटावे
पुणे – आणीबाणी जाहीर झाल्यावर अनुशासनपर्वात समाजात काही प्रमाणात शिस्त जरूर आली. काही प्रश्नही सुटले. परंतु सर्व प्रश्न मूलभूत परिवर्तनातून सुटावयास हवेत असे पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवदत्त दाभोळकर म्हणाले.
गुरुत्वाकर्षणाविरुद्ध घडत आहेत घटना
जेरुसलेम – मोटार गाड्या, पाणी, फुटबॉल या वस्तू उतारावरून खाली न जाता वर का जातात? हा प्रश्न इस्त्रायली शास्त्रज्ञांना सतावत आहे. जावाल मौकावर खेड्याकडून जेरुसलेमला जाताना रस्त्यावर एका ठिकाणी बंद करून गाड्या ठेवल्या असता त्या गाड्या टेकडीकडे जाऊ लागल्या; यावेळी त्या गिअरमध्ये नव्हत्या.
इस्त्रायली टीव्हीने पाणी व फुटबॉल त्या जागेवर ठेवून प्रयोग केला असता या वस्तूही उताराकडे न जाता टेकडीकडे जाऊ लागल्या. या घटना गुरुत्वाकर्षणाविरुद्ध घडत आहेत म्हणून कुतूहल होत आहे.