निवडणुकीनंतर घटक पक्ष विलीन होतील
अहमदाबाद, दि. 31 – आगामी लोकसभा निवडणुकीनंतर जनता पक्षाचे घटक पक्ष विलीन होतील, असे जनता पक्षाचे अध्यक्ष मोरारजी देसाई म्हणाले. निवडणुकीस अल्प मुदत दिली गेल्याने विरोधी पक्षांचे विलिनीकरण होऊ शकले नाही, असेही देसाई म्हणाले. येथे निवडणूक प्रचाराच्या सभेत ते बोलत होते.
श्रीलंकेत सेन्सॉरशिप उठली
कोलंबो – अत्यावश्यक सेवांच्या संप काळात लागू करण्यात आलेली सेन्सॉरशिप उठविण्यात आली असून या हुकुमाची अंमलबजावणी त्वरित होईल.
इस्रायलला मान्यता देण्यास अरब तयार
न्यूयॉर्क – इस्रायलला “मान्यता’ देण्यास अरब देश तयार आहेत; परंतु इस्रायलने व्यापलेल्या सर्व देशांतून माघार घेतली पाहिजे, अशी अट आहे, असे संयुक्त राष्ट्रसंघाचे अध्यक्ष डॉ. कुर्त वाल्डहाइम यांनी म्हटले. गेले 3 आठवडे त्यांनी इजिप्त, सीरिया, जॉर्डन व इस्रायल यांच्या राजदूतांशी जीनिव्हा परिषदेबाबत बोलणी केली.
राजकीय स्थानबद्ध मुक्त करा
नवी दिल्ली – जनता पक्षाचे नेते अटलबिहारी वाजपेयी यांनी राजकीय स्थानबद्धांची त्वरित सुटका करावी, अशी मागणी केली.