इंदिरा गांधींना पुन्हा सत्तेत येण्याचा पूर्ण हक्क आहे
भोपाळ – पंतप्रधान मोरारजी देसाई म्हणाले की लोकशाहीत विरोधी पक्ष हवाच व तो समर्थ हवा म्हणून मी कॉंग्रेसला सुयश चिंतितो. इंदिरा गांधींना पुन्हा सत्तेवर येण्याचा लोकशाहीत संपूर्ण हक्क आहे. जनतेला त्या हव्या असतील तर त्या पुन्हा सत्तेवर येऊ शकतील. मिसा कायद्याबाबत बोलताना देसाई म्हणाले, पर्यायी उपाययोजना तयार होताच मिसा कायदा मागे घेण्यात येईल. हे काम लवकरच करण्यात येईल. स्थानबद्ध इसमला स्थानबद्धतेविरुद्ध कोर्टात दाद मागता आली पाहिजे.गांधीजींशी तुलना
होऊ शकत नाही
भोपाळ – पंतप्रधान मोरारजी देसाई यांना असा प्रश्न विचारण्यात आला की, सध्याच्या काळात जयप्रकाशांची भूमिका महात्मा गांधीसारखी आहे काय? त्यावर मोरारजी म्हणाले, महात्मा गांधींचे स्थान अद्वितीय होते व त्यामुळे त्यांचे स्थान देशात इतर कोणालाही मिळू शकणार नाही. जेपींना गांधींचे स्थान मिळावे म्हणून कधी दावा केलेला नाही. एखाद्या माणसाची तुलना तुम्ही महात्मा गांधींशी करू शकाल व त्याची महती वाढवाल. पण महात्मा गांधींची तुलना एखाद्या माणसाशी करून तुम्ही गांधीजींची किंमत कमी करू नका.