मुंबई : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी विभागीय आयुक्तांना 45 कोटींचा निधी देण्यास मान्यता दिली आहे. कोरोना बाधित जिल्ह्यांना आपत्ती निधीमधून तात्काळ निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य कार्यकारी समितीने घेतला आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोकण विभागाला 15 कोटी, पुणे विभाग 10 कोटी, नागपूर विभाग 5 कोटी, अमरावत विभाग 5 कोटी, औरंगाबाद विभाग 5 कोटी, नाशिक विभाग 5 कोटी असा एकूण 45 कोटीचा निधी देण्यात येणार आहे.