नेवासा तालुक्‍यात 44 लाख पकडले

नगर  – नगर-औरंगाबाद महामार्गावर नेवासा येथील खडका फाटा टोलनाक्‍यावर चारचाकीतून दोन लाख, तर घोडेगाव येथे 42 लाख रुपये, असे एकूण 44 लाखांची रोकड जप्त करण्यात आली होती.

चौकशी नंतर 44 लाख रुपये हे बॅंकेचे असल्याचे तपासात समोर आले. मात्र, दुसऱ्या कारवाईतील दोन लाख रुपयांचा ताळमेळ न लागल्याने ते पैसे श्रीरामपूर येथील कोशागार कार्यालयात जमा करण्यात आले, अशी माहिती नेवासा मतदार संघाचे निवडणुक निर्णय अधिकारी शाहुराज मोरे दिली.

औरंगाबादहुन मुंबईकडे जाणारी (एम. एच.-20, ई. वाय- 9399) कारमधून दोन लाख रुपये रक्कम जप्त करण्यात आली. या कारला नाकाबंदी पथकाचे ई.डी. पाखरे यांच्या पथकातील पोलीस सुरेश कानडे, संभाजी गर्जे, नितीन भताने यांनी सोमवारी (दि.7) रोजी सकाळी नाकाबंदी करून कारवाई केली. दोन लाख रुपयांची रोकड आढळून आली.

घटनेनंतर पथकाने सहायक निवडणूक निर्णय अधिकारी समीर शेख, शेखर शेलार यांना बोलवले. त्यांनी टोलनाका येथे या रकमेचा पंचनामा करून कार नेवासा तहसील कार्यालयात जमा केली. ही रक्कम पुढील कारवाईसाठी श्रीरामपूर कोषागारात पाठविण्यात आले.

घोडेगाव येथील भरारी पथकाच्या भाऊसाहेब गडाख,गणेश अडगळे,वैभव झिने यांनी केलेल्या कारवाईत तब्बल 44 लाख रुपये पकडले. त्यानंतर या रकमेची चौकशी केली असता ही रक्कम बडोदा बॅंकेची असल्याचे समोर आले.

Leave A Reply

Your email address will not be published.