रेडा, -इंदापूर तालुक्यातील विविध विकासकामांना उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समिती बैठकीत इंदापूर तालुक्यासाठी 43 कोटी 35 लक्ष इतका मंजूर झाल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे.
भरणे म्हणाले की, उपमुख्यमंत्री पवार व खासदार सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा निधी मंजूर झूार आहे. दोन गावांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्यासाठी 30-54 व 50-54 योजनेअंतर्गत अधिकचा निधी देण्याचा प्रयत्न केला आहे. निधी मंजूर झालेली गावे व निधी (लाखांत) पुढीलप्रमाणे : जनसुविधाअंतर्गत- गोतोंडी 12, डाळज नं 2-43, डाळजं नं 3- 15, लाकडी 20, कुरवली 25, पिंपरी बु. 44, पवारवाडी -9, थोरातवाडी 21, गलांडवाडी नं 2-53,
शिंदेवाडी 23, निंबोडी 41, काझड-32, मानकरवाडी 15, अकोले 20, निरगुडे 28, रुई 21, रणगांव 5, उध्दट 30, बळपुडी 16, पडस्थळ-5, कौठळी-20, चिखली-31, – जाचकवस्ती 40, सपकळवाडी-69, कचरवाडी 24, म्हसोबाचीवाडी 26, अवसरी 10, वरकुटे बुद्रुक- 10, माळवाडी 10, डिकसळ 8, आजोती 28, भांडगांव 28, घोरपडवाडी 37, तक्रारवाडी 23, शिरसोडी 29, गोखली 25, कालठण नं 2-20, शहा 12, कांदलगांव 21,
निरवांगी 5, कालठण नं 1-10, आनंदनगर मुस्लमानवस्ती 5, गिरवी 56, झगडेवाडी 50, पंधारवाडी 10, न्हावी-5, अवसरी 6, भरणेवाडी 26, चाकाटी-35, जाधववाडी-32, शेटफळगढे 18 अगोती नं 2-15, अगोती नं 1-38, लुमेवाडी 17, तरंगवाडी-20, गोदी 26, पोंधवडी 32, जंक्शन 8, जांब 32, डाळज न 1-35, पिंपरी खुर्द- 10, सरडेवाडी- 3, – कडबनवाडी 15, शेटफळ हवेली- 20, चांडगांव 8, वालचंदनगर 8, तावशी 5-
भरघोस निधी, क्रीडा संकुलाला मदत
नागरी सुविधाअंतर्गत वडापुरी, निमसाखर, बेलवाडी, लासुर्णे, मदनवाडी, सणसर, कळंब, अंथुर्णे, पळसदेव, निमगांव केतकी, काटी, बावडा, बिजवडी, बोरी, शेळगांव आदी गावांत भरीव निधी दिला आहे. तसेच 30-54 व 50-54 या योजनेअंतर्गत रस्त्यासाठी शिंदेवस्ती जोडमार्ग, रत्नपुरी ते रणगांव रस्ता, चौगुलखडा ते लासुर्णे रस्ता, भोसले वस्ती बारवकरवस्ती निमगांव केतकी रस्ता, शहा रस्ता, अगोती नं. 2, लाकडी ते सावळ रस्ता,
खोरोचीअंतर्गत म्हसोबा मंदिर ते महोदव मंदिर रस्ता, सपकळवाडी रस्ता, चव्हाणवाडी, रणवरेमळामार्ग थोरातवाडी, झगडेवाडी ते अभंगवस्ती, निरवांगी, लाकडी भगलेवस्ती ते निंबोडी हद्द, काझड रानमळा, न्हावी बोराटवाडी, थोरातवाडी, कुरवली, भरणेवाडी पोरीवाडी, भरणेवाडी, अंथुर्णे, वरकुटे खुर्द भवानीनगर- तावशी रस्ता,
सणसर सपकळवाडी तावशी रस्त्यांसाठी निधी दिला आहे. नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत अंथुर्णे येथे क्रीडा संकुल बांधकामासाठी 1 कोटी 82 लाख, तर कोविडअंतर्गत भिगवण, निमगांव केतकी व इंदापूर शहरकरिता नवीन विद्युतशवदाहिणी 3 कोटी 20 लाख इतका निधी लिा आहे.